पारोळा : कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाखाली एका अज्ञात महिलेने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी दुपारी ४.४५ वाजेच्या सुमारास घडली. महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील असून, याबाबत पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाखाली अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील एका महिलेने बिसलेरी बॉटलमध्ये पेट्रोल भरून आणून वाकड्या पुलाजवळ भोसले पोल्ट्री फार्मच्या शेजारी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून दगडावर बसून जाळून घेऊन आत्महत्या केली. तिच्या अंगावर लाल कलरची साडी वेगवेगळे ठिपके असलेली गळ्यात मंगळसूत्र पायात चप्पल अशी सुशिक्षित घराण्यातील महिला असल्याचे प्रत्यक्षदर्शीना दिसून आले.
याबाबत पोलिसात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस करीत आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर, आशुतोष शेलार पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, किशोर भोई कर्मचारी यांनी पंचनामा करून सदर महिलेने आणलेली पेट्रोलची बाटली तसेच कपड्याचे नमुने व चप्पल ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असून याबाबत पोलिसांनी या महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान केले आहे.