पारोळा : अक्षय तृतीयेनिमित्त पारोळा येथील प्रसिद्ध श्री झपाट भवानी मातेची यात्रोत्सव आहे. यानिमित्ताने श्री भवानी गड संस्थान येथून सायंकाळी ठीक ६ ते रात्री ९.३० या वेळेत आई झपाट भवानी माता व श्रीदेवी पद्मावती मातेचा सालाबाद प्रमाणे होणारा पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
सदर पालखी सोहळ्याचा मार्ग हा श्री भवानी गड संस्थान येथून आझाद चौक, लवण गल्ली, त्रिमूर्ती व्हिडिओ चौक, बालाजी मंदिर यावेळी श्री बालाजी मंदिरात आरती व श्री बालाजी संस्थानच्या वतीने पालखीचे स्वागत त्यानंतर पुन्हा पालखी रथ चौक ते कासार गणपती चौक, गजानन महाराज मंदिर, बहिरम गल्ली मार्गे हत्ती गल्ली, जगदंबा मंदिर व तेथून परत हत्ती गल्ली मार्गे शेवडी गल्ली ते भवानी चौकातून भवानी गडावरती परत असा पालखीचा मार्ग असणार आहे. सदर पालखी सोहळ्यात बँड डीजे व आकर्षक रोषणाई लाईट छत्रीचं आकर्षण असेल तरी सदर पालखी सोहळ्यात व श्री झपाट भवानी मातेच्या आखाजी यात्रेत हजारोच्या संख्येने सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भवानी गड संस्थानच्या वतीने डाँ. मंगेश तांबे यांनी केले आहे.