---Advertisement---

पारोळ्यात आबा मराठेसह अनेकांचा भाजपात प्रवेश

---Advertisement---

पारोळा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवडत्या पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज सोमवारी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.

जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते व एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात जाहीर प्रवेश केला. यामध्ये आबा मराठे, संभाजीराजे मराठे, बबलू चौधरी, कैलास मराठे, सोनू मराठे, पिंटू चौधरी, तेजस चौधरी, देवा मराठे, प्रवीण पाटील, मच्छिन्द्र पाटील, विक्की पाटील यांनी प्रवेश केला.

यावेळी भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाउपाध्यक्ष भागवत चौधरी, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक भैय्या चौधरी, नगरसेवक पी. जी. पाटील, एन. एन. वाईन शॉपचे संचालक बापू चौधरी, सुनिल चौधरी, युवा मोर्चा पदाधिकारी विजय जगताप उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment