पारोळा : येथील डी. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीने मैत्री दिनाचे औचित्य साधून परिसरात ५१ रोपांची लागवड करून निसर्गाशी मैत्री केली आहे. सोबत संगोपनाची प्रतिज्ञा देखील घेण्यात आली.
शहरातील डी. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे मैत्री दिन आणि दीप अमावस्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष डी. बी. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येकाने दरवर्षी सुमारे दहा ते वीस झाडे लागवड करून त्या झाडांना काळजीपूर्वक संगोपनाची प्रतिज्ञा देखील घेतली. विविध प्रकारचे तब्बल ५१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यामुळे आगामी काळात कॉलेज’चा परिसर हिरवळीने बहरणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. आदित्य पाटील यांच्या संकल्पनेतून या हरीत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सचिव छाया दिलीप पाटील, संचालक डॉ. खुशी दिलीप पाटील, प्राचार्य शिरीष चौधरी, ऍड. सतिष काटे, नाना मराठे उपस्थित होते.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ‘वृक्षारोपण’
निसर्गाची विस्कटलेली घडी एका दिवसात आपण ठीक करू शकत नाही. पण वृक्षारोपण माध्यमातून शाश्वत प्रयत्न करू शकतो. निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज असल्याचे मत अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी प्रा.वैभव पाटील, पूनम पाटील, प्राजक्ता पाटील, कर्मचारी अमोल साळुंखे, राहुल निकम, भटू साळुंखे, महिंद्र पाटील, रितेश मराठे, अतुल वाघ यांनी परिश्रम घेतले.