पारोळ्यात वधू-वरांसह वऱ्हाडीनी घेतली मतदानाची शपथ

पारोळा : येथील साई नगरातील रहिवाशी कै. नाना पंडित महाजन यांचे चिरंजीव चि. अमोल आणि दहिवद ता. अमळनेर येथील ज्ञानेश्वर गरबड महाजन यांची सुकन्या चि.सौ.का. निशा यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. यात वधू-वरांसह वऱ्हाडीनी मतदानाची शपथ घेत मतदान करण्याचा निश्चय केला.

बहुतांश मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी दिसून येत आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघात मतदान व्हायचे असल्याने मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजवावा. जगातील सर्वात मोठी लोकशाही बळकट करावी या उद्देशाने व्यापक जनजगृती साठी लग्न मंडपातच सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. यात अनेकांनी सेल्फी घेत ‘मी मतदान करणारच’ असा दृढ निश्चय केला.

लग्न मांडवात’चं सेल्फी पॉईंट

मतदानाबाबत व्यापक स्वरूपात जनजगृती व्हावी या सद्हेतूने महाजन परिवाराने लग्न मांडवातचं मतदानाबाबत जनजागृती करणारा सेल्फी पॉईंट उभारला यात अनेकांनी सेल्फी घेत ‘माझं मत माझं भविष्य’, मी मतदान करणारच असा चंग बांधला. यापूर्वीही महाजन परिवाराने पत्रिकेत ‘देव, धर्मासाठी मतदान देशासाठी, चला करू मतदान संकल्प हाच महान’ तत्सम जनजागृती करणारे संदेश देवून जनजगृती केली आहे. याकामी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सहाय्यक प्रकल्पधिकारी चंद्रकांत महाजन, कक्ष अधिकारी भूषण महाजन यांचे सहकार्य लाभले.