तरुण भारत लाईव्ह । १३ सप्टेंबर २०२३। संध्याकाळी भूक लागली की वेगळं काहीतरी खायला हवं असत पण वेगळं काय करावं हा प्रश्न पडतो. तर अशावेळी तुम्ही पालक पनीर कचोरी करून खाऊ शकता. पालक पनीर कचोरी घरी करायला खूप सोपी आहे. तर जाणून घेऊयात पालक पनीर काचोरीची रेसिपी.
साहित्य
पालक, मैदा, जिर, हिरव्या मिरच्या, आल, लसूण, कांदे, पनीर, गरम मसाला, हळद, तिखट, तेल, मीठ, बारीक शेव,सॉस
कृती
सर्वप्रथम चिरलेला पालक पाण्यात टाकून जराशी उकळी येईपर्यंत गरम करून घ्यावा. त्यातील सर्व पाणी काढून टाकावं आणि त्या घट्ट पालकांमध्ये चार हिरव्या मिरच्या जिरं, लसूण पाकळ्या व चवीनुसार मीठ घालून पाणी न घालता मिक्सरमधून छान प्युरी बनवून घ्यावी.
नंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीर चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या आलं पाच-सहा लसूण पाकळ्या पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून चटणी तयार करावी. नंतर मैद्यामध्ये दोन ते तीन चमचे गरम तेल टाकून त्यात तयार केलेली पालक प्युरी टाकावी.
जरासं मीठ टाकून मळून छान एकजीव करून गोळा तयार करावा. सारणासाठी बारीक चिरलेला कांदा तेलात चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात गरम मसाला हळद लाल तिखट घालून छान परतावं.
तेल सुटायला लागलं की त्यात चवीनुसार मीठ घालून पनीर कूसकरून करून टाकावं मग हे सारण छान एकजीव करून घ्यावं. आता पालक मिश्रित मैद्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे गोळे करून घ्यावे.
एक एक गोळा गोल लाटून त्यात पनीरच सारण आवश्यकतेनुसार भरावे आणि मग पालक पनीर कचोरीचे हे गोळे चांगले बंद करावेत. अशा पद्धतीने सर्व पालक पनीर कचोरीचे गोळे तयार करून घ्यावे.आणि मग एकेक करून मंद आचेवर गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. तयार आहे पालक पनीर कचोरी.