जळगाव : तालुक्यातील पाळधी येथे श्री सिध्दी वेंकटेश देवस्थान जळगाव यांच्या माध्यमातून श्री सिध्दी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उद्या मंगळवार ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. बुधवार २२ फेब्रुवारी रोजी त्याची सांगता होणार आहे. १०० टन वजनाची ३१ फूट उंच असलेली भारतातील सर्वात मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची (रिद्धी सिद्धी सहित) उजवी सोंडमध्ये अमृतकुंभ, पोटावर नाग आणि कपाळावर घंटा असलेल्या महागणपतीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. १६ दिवस हा धार्मिक सोहळा चालणार आहेत. ९ यज्ञ कुंडाव्दारे २ लाख ५१ हजार आहुती दिल्या जाणार आहेत. दररोज सकाळी ८ वाजता नित्य पूजा, सकाळी ११ वाजता महायज्ञ, दुपारी ४ ते ६ अथर्वशीर्ष पठण, संध्याकाळी ६ वाजता संध्याकाळी ६ वाजता भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१०० टन वजनाची ३१ फूट उंच मूर्ती
भारतातील एकमेव १०० टन वजनाची ३१ फूट उंच असलेली सर्वात मोठी गणपती मूर्ती (रिद्धी सिद्धी सहित) उजवी सोंडमध्ये अमृतकुंभ, पोटावर नाग आणि कपाळावर घंटा असलेल्या महागणपतीच्या मंदिराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. ३१ फुट उंच अखंड पाषाणातून बनविलेली मूर्ती, १५ फूट उंच रिद्धी सिद्धी मूर्ती, २० हजार स्क्वेअर फुट मंदिराचा ग्रॅनाईट सभागृह, ५० बाय ५० फूट गर्भ गृहाचे निर्माण, १०० टन महागणपती मूर्तीचे वजन, १२५ फूट उंचीवर ९ फुटाचा मंदिराचा कळस, २०० किलोची महाघंटा, १०० फूट रुंद २१ पायर्या, ५ हजार वर्षांपेक्षा जास्त मूर्तीचे आयुष्य, ६ फुटाचा बैठकी मूषकराज, २४ फुटाचे महापंखे, ५ हजार भक्तांच्या स्वहस्तलिखित ॐ गं गणपतये नमः चा २१ करोड जाप मूर्तीच्या २१ फूट खाली ठेवले आहेत.
असे आहेत धार्मिक कार्यक्रम
७ फेब्रुवारी रोजी प्रायश्चित, संकल्प, अभिषेक, ८ रोजी मंडप पूजन, हवन प्रारंभ, अंकुर रोपण, ध्वजारोहण ९ रोजी वेद पठण, सहस्त्र मोदकाचा अभिषेक हवन आहुती, १० रोजी देव आराधना, ५ कलशांचे स्नान, फुलांचा अभिषेक तर ११ रोजी महाकुंभ स्थापना, गावराणी तुपाचा अभिषेक, १२ रोजी सहस्त्रनाम अर्चना, अत्तराचा अभिषेक, १३ रोजी नित्य पूजा, होम- हवन, दूध दहीचा अभिषेक, १४ रोजी कळस स्थापना, चंदनाचा अभिषेक, १५ रोजी दूर्वांचा अभिषेक हवन – आहुती, १६ रोजी नित्य पूजा व धूप, अगरबत्ती, गुग्गुळ यांचा अभिषेक, १७ रोजी ३१ कळसांचा अभिषेक, मिठाईचा अभिषेक, १८ रोजी बेलपान, तीर्थ, जल यांचा अभिषेक हवन – आहुती, १९ रोजी ५१ कळसांचा अभिषेक, साखर, सिंदुराचा अभिषेक, २० रोजी (सोमवती अमावस्या) मुद्राभिषेक (नाणे, सिक्के ),१०८ कळसांचा अभिषेक, २१ रोजी विशेष होम- हवन, महाशयन, आरती रात्री ८ वाजता, २२ रोजी पट व्दार खोलने, प्राणप्रतिष्ठा पूर्णाहुती दुपारी १ वा. होणार आहे.
श्री सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमास सर्व गणेश भक्तांनी उपस्थिती देण्याचे आवाहन श्री सिद्धी वेंकटेश देवस्थान जळगावद्वारे करण्यात आले आहे. जळगावपासून १४ कि.मी.अंतरावर धुळे रोडवरील पाळधी येथे श्री सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगळवार ७ ते २२ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. दरम्यान १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.