पावसाच्या अंदाजाने वाढवली शेतकर्‍यांची चिंता; वाचा सविस्तर

पुणे : एकीकडे अवकाळी पावसानं तडाखा दिला असताना दुसरीकडे एक चिंतेत टाकणारी बातमी समोर येतेय, जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. देशात यावर्षी सरासरीच्या केवळ ९४ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्कायमेट या खासगी हवामान शाळेने हा अंदाज वर्तवला आहे. गेल्या चार वर्षात अल निनोमुळे चांगला पाऊस झाला पण यावर्षी अल निनोचा प्रभाव वाढल्यामुळे पाऊस कमी पडेल असं सांगितलं जातंय.

एकीकडे कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. राज्यात तब्बल ३८ हजार हेक्टरवर अवकाळी, गारपिटीमुळे नुकसान झालंय. सटाणा तालुक्यात १००० हेक्टरवर कांद्याचं नुकसान झालंय. हे नुकसान गेल्या २ दिवसांत झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे झालंय. राज्यात सुमारे १० हजार एकरवरील द्राक्षबागांना अवकाळीचा तडाखा बसलाय.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने द्राक्ष, टरबूज, आंबा, केळी या फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय…तर भाजीपाला, इतर पीकही उद्ध्वस्त झालीय. काढणीला आलेला कांदा, कांदा बियाणे, फळबागा आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला. वादळी वारा आणि पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले तर झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेलं गहू पीक जमीनदोस्त झालंय.