तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। आशिया चषक सुपर फोर फेरीतील भारत पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवण्यात आला. यामुळे सामन्यातील उर्वरित खेळ सोमवारी राखीव दिवशी खेळण्यात येईल पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताने२४.१ शतकात दोन बाद १४७ धावा केल्या होत्या. सोमवारी या स्थितीतून सामना सुरू होईल याआधी साखळी फेरीतील २ सप्टेंबरला झालेला भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. परंतु रविवारच्या सामन्यासाठी क्रिकेट परिषदेने राखीव दिवस ठेवला होता.
सोमवारी हा सामना दुपारी तीन वाजेपासून जिथे थांबला तिथून खेळविण्यात येईल. सुमारे दीड दोन तास पाऊस पडला नंतर मैदान कर्मचाऱ्यांनी मैदान खेळणा योग्य तयार करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. मैदान ओलसर राहिल्याने कर्मचाऱ्यांनी स्पन्जच्या साह्याने मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मैदान खेळणा योग्य झाले ही परंतु पुन्हा पावसाने हजारी लावल्याने अखेर सामना पुढे ढकलण्यात आला. त्याआधी प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी शानदार अर्धशतक झळकावत शंभर चेंडूत १२१ धावांची जबरदस्त सलामी दिली.
शादाब खानने सतराव्या शतकात रोहितला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात शाहीन शाह आफ्रिदीने गिलला बाद करून पाकिस्तान ना पुनरागमन करून दिले. रोहित ने ४९ चेंडू सहा चौकार व चार षटकारांसह५६ तर गेले ५२ चेंडू दहा चौकारांसह ५८ धावा केल्या. यानंतर विराट कोहली नाबाद आठ आणि दुखापतीतून सावरून पुनरागमन केलेला लोकेश राहुल नाबाद सतरा यांनी तिसऱ्या गडासाठी ३८ चेंडू नाबाद २८ धावांची भागीदारी करत भारताला सावरले यानंतर पावसामुळे खेळ थांबला.
भारतीय वेळेनुसार साडेपाच वाजता पाऊस थांबल्याने ५.५७ ला कव्हर्स काढण्याचं काम सुरू झालं परंतु सहा वाजून दोन मिनिटांनी पुन्हा पाऊस सुरू झाला सहा वाजून बावीस नंतर शतक कमी होत गेली. साडेसात वाजता मैदानाची पाहणी केली गेली आणि पंचांनी बराच वेळ घेतला काही ठिकाणी त्यांनी मैदान कर्मचाऱ्यांना पुन्हा रोलर फिरवणार सांगितलं पंचांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांशी चर्चा केली आठ वाजता आणि त्यानंतर साडेआठ वाजता पाहणी झाली. अखेर ३४-३४ षटकांचा सामना होणार असल्याचे जाहीर केले. नऊ वाजता सामना सुरू होण्याची शक्यता होती पण त्यापूर्वीच पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला.
एक दिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या शाहीनशाह अफ्रीतीला पहिल्याच षटकात षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला अशाच स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावणारा शुभमंगीर चौथा युवा भारतीय फलंदाज ठरला आशियात चषक स्पर्धेत रोहित शर्मा ने पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक सहाव्यांदा पन्नास हुन अधिक धावांची खेळी केली