एरंडोल : गेल्या काही दिवसांत एरंडोलसह जिल्ह्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मुख्यत: फ्लू आणि टायफॉइड, मलेरिया या आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक दिसत असून, शहरातील सर्व रूग्णालये फुल् झाले आहेत.
व्हायरल संसर्गाच्या विषाणूने सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. नगरपालिकेने नागरिक आरोग्याच्या दृष्टीने शहरात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी. शहरात फवारणी करावी, यासह इतर उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी मागणी होत आहे. नगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा दुषित असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्याकडे न.पा.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
शिवाय नागरिकांनीही आपला घर परिसर स्वच्छ कसा राहील ? व दैनंदिन साफसफाईसाठी नागरिकांनी जागृत असावे अशी जाणकारांची अपेक्षा आहे. रोगराई टाळण्यासाठी नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन न.पा.मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले आहे.