---Advertisement---

पिस्टल लावून व्यापार्‍याला लुटले : भुसावळातील आठवडे बाजारातील घटना

---Advertisement---

भुसावळ : किराणा मालाच्या होलसेल व्यापार्‍याला पिस्टलाच्या धाकावर लुटण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आठवडे बाजारात घडली. सुदैवाने व्यापार्‍याकडील रोकड बचावली असून या घटनेत मात्र आरोपींनी व्यापार्‍याच्या गळ्यातील चैन ओरबाडली मात्र त्यातील अर्धा भागच आरोपींच्या हाती लागल्याने तोच घेवून त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. या घटनेने शहरातील व्यापार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचार्‍यांनी धाव घेत घडलेला प्रकार जाणून घेतला.

व्यापार्‍यांमध्ये घबराट
भुसावळातील आठवडे बाजारात मोहनलाल चावरीया यांचे गणेश ट्रेडर्स नामक दुकान असून ते होलसेल किराणा मालाचे पुरवठादार आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान बंद करून दुकानाला नमस्कार करीत असताना तोंडाला मास्क लावून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी व्यापार्‍याला गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवत धमकावले व त्याच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र बॅग हाती न आल्याने व्यापार्‍याच्या गळ्यातील सोन्याची चॅन हिसकावण्यात आली मात्र त्यातही चैनचा अर्धाच भाग हाती आल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून पलायन केले. या प्रकारानंतर काही वेळ व्यापारी भांबावून गेला तर मार्केटमध्ये घटना कळताच व्यापारीदेखील धास्तावले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---