मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम सन्मान निधी योजना फायदेशीर ठरत असतानाच आता या निधीत भरघोस वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी या पीएम सन्मान निधीत २ हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. दरम्यान, या सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत ६ हजार रुपये वार्षिक निधी मिळत होता. तो आता ८ हजार रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्याची शक्यता आहे.
तसेच, तीन हफ्त्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रुपये मिळत होते. त्यात आता आणखी २ हजारांचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना ४ हफ्ते शासनाकडून मिळणार आहेत. दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत राज्यातील ८५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १८६६ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल.