पीएम मोदींची आज चंद्रपुरात विराट सभा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोमवार, ८ रोजी चंद्रपुरात सभा होणार आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी आज मोदी चंद्रपुरात येणार आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास मोदी चंद्रपुरात येतील असे म्हटले जात आहे.