पीएम मोदींची थोड्याच वेळात सर्वात मोठी मुलाखत… बोलणार ‘या’ मुद्द्यांवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खास मुलाखतीत 2047 च्या भारताची रूपरेषा सांगितली. माझे लक्ष्य 2024 नसून 2047 आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. वेगही वाढवायचा आहे आणि स्कीलही वाढवायचा आहे. देशासमोर एक संधी आहे. काँग्रेस सरकारचे मॉडेल आणि भाजप सरकारचे मॉडेल पहा, त्यांचे 5-6 दशकांचे काम आणि फक्त 10 वर्षांचे काम. फरक दिसून येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मुलाखत सायंकाळी साडेपाच वाजता प्रसारित होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक रोखे, इलॉन मस्क, सनातनच्या विरोधात विरोधकांचे विष, राम मंदिराला राजकीय शस्त्र बनवण्याचा विरोध याविषयीही आपले मत व्यक्त करतील. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतील. मुलाखतीत पीएम मोदी केंद्रीय तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्यासह इतर अनेक मुद्द्यांवर विरोधकांना घेरतील.