पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार, १० रोजी वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त चूरलमाला, मुंडक्काई आणि पंचिरिमत्तम गावांची. यावेळी त्यांच्यासोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय पर्यटन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी होते.
पीएम मोदींनी हवाई पाहणी केल्यानंतर भूस्खलनग्रस्त भागांची प्रत्यक्षात पाहणी केली. त्यांनी येथील बचाव कार्याची माहिती घेतली. केरळच्या या डोंगराळ जिल्ह्यात 30 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. वायनाड भूस्खलनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याच्या आणि बाधित लोकांसाठी भरपाई वाढवण्याची होत आहे.