---Advertisement---

पीओके वरुन भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले, वाचा सविस्तर

---Advertisement---

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीर वरुन भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानाला कडक शब्दात सुनावले आहे. यावेळी दक्षिण आशियातील शांततेसाठी भारताने पाकिस्तानला तीन सल्ले दिले. भारताने दहशतवाद थांबवण्यास, जम्मू-काश्मीरचा ताब्यात असलेला (PoK) भाग रिकामा करण्यास आणि अल्पसंख्याक लोकांवर होणारे अत्याचार थांबवण्यास सांगितले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्यावरुनही भारताने पाकिस्तानची पिसं काढली आहेत.

भारताकडून डिप्लोमेट पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला ताब्यात असलेला म्हणजेच पीओके परिसर रिकामा करण्यास सांगितले. केंद्रशासित प्रदेशाच्या ताब्यातील क्षेत्र रिकामे करण्यासोबतच दहशतवादाविरोधात कारवाई करण्यात यावी, असे भारताने म्हटले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तांत्रिक गुंतागुंतीत अडकण्याऐवजी पाकिस्तानने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर विश्वासार्ह आणि सत्यापित कारवाई करावी. दहशतवादी हल्ल्याच्या १५ वर्षांनंतरही भारत न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकड यांनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडल्यानंतर भारताच्यावतीने पेटल गेहलोत यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आपले मत मांडले. त्यांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानला मानवाधिकार सुधारण्याचा सल्लाही दिला. पेटल गेहलोत यांनी सांगितले की, पाकिस्तानने इतरांकडे बोटे दाखवण्याऐवजी मानवी हक्कांची नोंद सुधारली तर बरे होईल. अल्पसंख्याक आणि महिलांवर दररोज अत्याचार होत आहेत. पाकिस्तानमध्ये भूतकाळात ख्रिश्चन समुदायावर क्रूरता दिसून आली, त्याठिकाणी एकूण १९ चर्च जाळले गेल्या आणि ८९ ख्रिश्चन घरे जाळली गेली. पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाजातील महिलांची, विशेषत: हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांची स्थिती दयनीय आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment