पी.व्ही. सिंधूचे मेडलच्या दिशेने पहिले पाऊल; मालदीवच्या खेळाडूचा मोठ्या फरकाने पराभव

पीव्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकची विजयी सुरुवात केली आहे. तिने ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या फतिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा अवघ्या 29 मिनिटांत पराभव केला. सिंधूने पहिला गेम 13 मिनिटांत 21-9 असा जिंकला. दुसरा गेम 14 मिनिटांत 21-6 असा जिंकला.

दहावी मानांकित सिंधू या ऑलिम्पिकमध्ये सलग तिसरे पदक जिंकणार आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. हा विजय ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि मालदीवचा फातिमथ नब्बा अब्दुल रज्जाक यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पीव्ही सिंधूने पहिला सेट सहज जिंकला. तिने पहिला गेममध्ये अब्दुल रझाकचा 21-9 असा पराभव केला.

दुसऱ्या गेममध्ये रझाक पुनरागमन करेल असे वाटले होते. पण पीव्ही सिंधूने तो गेम पण सहज जिंकला. आणि दुसरा गेम 21-6 अशा फरकाने जिंकून मोहिमेला सुरुवात केली. पीव्ही सिंधूने आता पुढील फेरीत प्रवेश केला.