---Advertisement---

पुणे बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। पुणे बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. पुणे -बेंगळुरु महामार्गावर चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतात कोल्हापूर पोलिसाचा देखील समावेश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याने भयानक अपघात झालाय. साताऱ्यातील एक कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे हा भीषण अपघात झाल्याचे समजते. महामार्गावरील अपघातात मृत पोलीसासह त्यांची बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत. मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

मृत नितीन पोवार हे कोल्हापूर पोलीस कर्मचारी आहेत. मनीषा आप्पासाहेब जाधव आणि नितीन बापूसाहेब पोवार आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव अशी मृतांची नावे आहेत.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment