---Advertisement---

पुण्याचा खासदार राष्ट्रवादीचा? पोस्टर व्हायरल

---Advertisement---

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने या जागेवर दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही मैदानात उडी घेतली आहे. भावी खासदार म्हणून एका राष्ट्रवादी नेत्याचे पोस्टर व्हायरल झालं आहे.

भाजपकडून गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांची नावं चर्चेत आहेत.

दरम्यान, पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून भावी खासदार प्रशांत जगताप अशा आशयाची बॅनरबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसची असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता राष्ट्रवादीही लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं बॅनरवरून स्पष्ट होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment