पुण्यातील व्यवसायिक अमर मुलचंदानीला ईडीकडून अटक, काय आहे प्रकरण?

Pune News : पुण्यातील व्यवसायिक अमर मुलचंदानीला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या फसवणूकप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष होते. त्यांना 1 जुलै रोजी अटक केली आहे.

124 एनपीए कर्ज खात्यांमध्ये बँकेचे 429 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे बँक दिवाळखोरीत निघाली असून हजारो लहान ठेवीदारांचे नुकसान झाले आहे. ईडी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी, संचालक/अधिकारी आणि कर्ज थकबाकीदारांविरुद्ध पुण्यात नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला होता. त्यानुसार त्यांना अटक केली आहे. अमर यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमर साधुराम मुलचंदानी यांच्या विविध बेनामी संपत्तीसह या प्रकरणात यापूर्वी 122.35 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.