Nilesh Rane : पुण्यात भाजप नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पालिकेने कारवाई केली आहे. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने ही जागा पालिकेने सील केली आहे. मालमत्ता थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. या जागेवरतब्बल 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी होती. सध्या पुणे महापालिका थकित करा प्रकरणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत आहे.
पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्ता सील; काय आहे प्रकरण ?
Published On: फेब्रुवारी 28, 2024 1:24 pm

---Advertisement---