पुतिन यांचे कट्टर विरोधक तुरुंगातून बेपत्ता; कैद्यांच्या यादीतूनही नाव गायब

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधत अॅलेक्सी नवलनी हे तब्बल एक आठवड्यापासू बेपत्ता झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवलनी यांच्या वकिलांचे एक आठवड्यापासून त्यांच्याशी बोलणे झालेले नाहीये. इतकेच नाही तर कैद्यांच्या यादीमधून देखील त्यांचं नाव गायब झालं आहे.

मॉस्कोच्या पूर्वेला एका जेलमध्ये नवलनी यांना कैद करण्यात आले होते, त्यांना या वर्षीच तब्बल १९ वर्षांची कैद सुनावण्यात आली होती. नवलनी हे सोमवारी व्हिडीओ कॉफरन्सींगच्या माध्यमातून कोर्टात हजर केले जाणार होते, मात्र जेलकडून त्यांना सादर करण्यात आलं नाही. यावर लाइट नसल्याने नवलानी यांना हजर करता आले नाही, असं कारण जेल प्रशासनाने दिलं.

अॅलेक्सी नवलनी यांच्या प्रवक्ता कीरा यर्मिश यांनी सोमवारी सांगितलं की, नवलनी सहा दिवसांपासून गायब आहेत. पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून देखील त्यांचे वकील त्यांना भेटू शकत नाहीयेत. त्यांना नवलनी जेलमध्ये नसल्याचे सांगितले जात आहे. य़ार्मिश यांनी वकिलांना सांगितलं की दिलेल्या माहितीनुसार नवलनी कैद्यांच्या सुचीमध्ये देखील नाहीयेत. अधिकाऱ्यांनी त्यांना कुठे स्थानांतरित करण्यात आलं आहे याबद्दल कुठलीही माहिती दिली नाहीये.