पुलवामामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला आहे. दानिश शेख असे त्याचे नाव असून तो श्रीनगरचा रहिवासी आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि आग लावण्याचे साहित्य सापडले आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, राजपुरा भागातील फ्रेसीपुरा गावात दहशतवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. यावर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, स्वत:ला घेरलेले पाहून दहशतवाद्याने गोळीबार सुरू केला.