हकालपट्टी झालेल्या वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हकालपट्टी झालेल्या वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावरील आज सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही.
सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिले आहेत. आता याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.
पटियाला हाऊस कोर्टानेही दिली होती माहिती
यापूर्वी, पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दिल्ली पोलिसांना सर्वसमावेशक तपास करण्याचे निर्देश दिले होते.