पूर्व वैमनस्यातून दोन तरुणावर गोळीबार : भुसावळ तालुक्यात खळबळ

भुसावळ : तालुक्यातील साकरी फाट्यावर एका तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. अक्षय रतन सोनवणे (26) व मंगेश अंबादास काळे (नेब कॉलनी, भुसावळ) असे जखमी तरुणांचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराचे कारण अस्पष्ट असलेतरी समजलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असून तीन संशयीतांनी गोळीबार केल्याची माहिती आहे.

गोळीबाराने तालुक्यात खळबळ

भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीतील साकरी फाट्याजवळील एका शेतात दोघा तरुणांवर अज्ञातांनी गोळीबार माहिती तालुका पोलिसांना कळाल्यानंतर भुसावळ तालुका निरीक्षक विलास शेंडेसह सहकार्‍यांनी धाव घेतली. अक्षय सोनवणे या तरुणाला सुरूवातीला गोदावरीत हलवण्यात आले असून या तरुणाच्या पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, जखमी तरुणाच्या जवाबानंतर तो कोणत्या गावातील रहिवासी आहे वा गोळीबार नेमका कुणी वा का केला? याचे स्पष्ट कारण कळणार आहे. भुसावळ तालुक्यात गोळीबाराच्या घटनेने मात्र मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गोळीबाराच्या घटनेनंतर गोदावरी रुग्णालयात धाव घेत जखमींकडून घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली.