सततचा पाऊस, पूर आणि पाणी साचल्यामुळे अनेक राज्यांतील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशप्रमाणेच गुजरातच्या अनेक भागात यावेळी मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नवसारी येथे आज एवढा मुसळधार पाऊस झाला की, गॅस एजन्सीच्या गोदामात ठेवलेले सिलिंडर वाहून गेले, तर मोठ्या प्रमाणात गाड्या वाहून गेल्या.
गुजरातमधील नवसारी येथे पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज येथे मुसळधार पाऊस झाला असून संततधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सुरत, वलसाड आणि नवसारी येथे २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण गुजरात, सौराष्ट्र तसेच द्वारका, जामनगर आणि पोरबंदरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
https://twitter.com/i/status/1682721258809487360
https://twitter.com/i/status/1682716871475224576
https://twitter.com/i/status/1682578169881133056