जळगाव : विवाहितेला ५ लाखांची मागणी करत मारहाण करत, जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील माहेर असलेल्या दामिनी मुकेश चव्हाण (२४) यांचा गुजरात राज्यातील उधना येथील मुकेश सुभाष चव्हाण यांच्यासोबत रितीरिवाजानुसार लग्न झालेले आहे. लग्नाच्या सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती मुकेश याने विवाहितेला पाच लाखांची मागणी केली.
विवाहितेने पैशांची पुर्तता न केल्याचा रागातून तिला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासरे, सासू आणि नणंद यांनी देखील पैशांसाठी शिवीगाळ करत मानसिक त्रास दिला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून गेल्या.
विवाहितेने शनिवारी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती मुकेश सुभाष चव्हाण, सासरे सुभाष सिताराम चव्हाण, सासू कलाबाई सुभाष चौधरी, नणंद रोशनी नितीन खरकार आणि भारती योगेश वाघ सर्व रा. उधना, सुरत राज्य गुजरात यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंदूलाल सोनवणे करीत आहे.