तरुण भारत लाईव्ह । २२ सप्टेंबर २०२३। संध्याकाळी भूक लागते पण संध्याकाळी असं काहीस चमचमीत खावंसं वाटत मग अशावेळी वेगळं आणि चटपटीत असं काय करावं हा कठीण प्रश्न असतो. मग अशावेळी तुम्ही सँडविच करू शकता. अगदी झटपट बनणार असं हे सँडविच आहे. चला तर लगेच सँडविचची रेसिपी नोट करून घ्या.
साहित्य
ब्रेड, बटाटे, चीज, बटर, मीठ, चाट मसाला
कृती
सर्वप्रथम,ब्रेडच्या स्लाईसला बटर लावून घ्या. यानंतर बटाटे उकडून घ्या. बटाट्याच्या चकत्या पाडा बटाट्याच्या चकत्या ब्रेडच्या स्लाईसवर लावा. त्यावर चीज, मीठ आणि चाट मसाला टाका. आणि त्यावर दोन ब्रेड स्लाइस ठेवा. त्यानंतर त्रिकोणी आकारात ब्रेड स्लाइस कापा हे सँडविच तुम्ही सर्व्ह करण्यापूर्वी तव्यावर तेल किंवा तूप टाकून भाजू शकता.