रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने रेल्वेमध्ये ‘असिस्टंट लोको पायलट’च्या 5969 रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना काढली आहे. यासाठी 10वी पास आणि ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे.
या भरती उद्या म्हणजेच 20 जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
अर्ज कोण करु शकेल?
उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून ITI डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. तसेच उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष तर कमाल ३० वर्ष असायला हवे. राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सवलत देण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अधिकृत सूचना वाचणे गरजेचे आहे.
अर्ज फी : अर्जाची फी 500 आणि 250 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
वेतनमान : असिस्टंट लोको पायलटचा पगार 19900- 63200/- (स्तर-2) या वेतनश्रेणीनुसार असेल.
निवड कशी केली जाईल?
कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -१ (CBT)
कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -२ (CBT)
कम्प्यूटर बेस्ड एप्टीट्यूड टेस्ट (CBAT)
डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन
मेडिकल टेस्ट
अर्ज कसा कराल?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IndianRailways.gov.in अधिकृत साइटला भेट द्यावी.
अधिक माहितीसाठी अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा