पोलिसांची गावठी हात भट्टयावर धाडी; दोनशे लिटर दारू जप्त

रावेर : तालुक्यातील थेरोळे शिवारातील गावठी हात भट्टीच्या अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून भट्ट्या उध्वस्त केल्या. दरम्यान, पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला.  मात्र, सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना थेरोळ्या शिवारात गावठी हात भट्टीव्दारे दारू तयार केली जाते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक घनश्याम तांबे ,हवालदार अर्जुन सोनवणे, पो. का.राहुल परदेशी, चैतन्य नारखेडे या पथकाने तापी नदीच्या काठावर असलेल्या दोन ठिकाणी असलेल्या हात भट्टीवर धाड टाकून या हात भट्टी उध्वस्त केल्या. पोलीस दिसताच आरोपी पळून गेले. याबाबत आरोपी भिमराव बंन्सी अटकाळे, भिमराव गंभीर अटकाळे , सुपडु गंभीर अटकाळे रा. थेरोळा तालुका रावेर यांच्या विरूद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास .हे.कॉ.अर्जुन सोनवणे, नितीन आमोदकर पुढील तपास करीत आहे.

धाडीत मिळालेला माल
या धाडीत हात भट्टीवर ११,५०० रुपये किमतीची
२३० लिटर गावठी हात भट्टीची दारू, ८,००० रुपये किमतीचे ४,०० लिटर गुळ मोह मिश्रीत उकळते पक्के रसायन , २८,००० किमतीचे ४०० लीटर कच्चे रसायन गुळ मोह मिश्रीत प्लॅस्टीकच्या ड्रम , कँनमध्ये भरलेले असा एकुण ४७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल माल मिळून आला.