पोलिसांवर दगडफेक, २९ जणांना अटक, सात जणांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

एरंडोल : पोलिसांच्या दिशेने मोठमोठे विटा व दगड फेक करण्यात आल्याची घटना २२ जानेवारी रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास रंगारी पुलाच्या कोपऱ्यावर घडली. या दगडफेकीत सहाय्यक गणेश अहिरे , पोलीस उपनिरीक्षक शरद बागल , पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, पोलीस नाईक अकील मुजावर हे जखमी झाले. दगडफेकीच्या या घटनेमुळे शहरात काहीसा तणाव निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीसांत विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये, तोफिक शहा रफिक शहा, बिस्मिल्ला खान बलदार खान पठाण, रिजवान सरदार शहा, जुनैद शहा सरदार शहा, शेख रहीम शेख रफीक, शेख इकबाल शेख जाफर, आरिफ अली नावाब अली सैय्यद, कादिर शहा रफिक शहा, शोएब शेख रफिक, शाहरुख शेख रशीद, जुबेर अब्दुल शहा, सुलेमान इस्माईल मन्सुरी/पिंजारी, मुस्ताक शेख यासीन बेलदार, एजाज अहमद शेख अब्दुल्ला, इम्रान शेख इस्माईल बेलदार, अनिस शब्बीर कुरेशी, आसिफ शेख रहेमान बेलदार, मुक्तार शेख करीम बेलदार, जाकीर शेख रहिमान बेलदार, शेख शहीद शेख इस्माईल बेलदार, शेख इरफान शेख जब्बार, शेख वाजिद शेख फरीद, शेख मोहसीन शेख अलीम, नुर शहा सरदार शहा, मोहम्मद अल्ताफ मोहम्मद हारून, निजामुद्दीन हुसैनोद्दीन मुजावर, असलम रशीद पिंजारी,शेख मुजाहिद शेख मुसीर, आशु बार्शीद मुजावर सर्व राहणार एरंडोल यांचा समावेश आहे.