---Advertisement---

पोलिसांसह सर्वच चकित : ज्वेलर्सच्या दुकानात घुसण्यासाठी खोदला बोगदा, श्रीकृष्णाची मूर्ती फिरवली उलटी, अन्..

---Advertisement---

मेरठ : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.  या चोरीच्या विचित्र घटनेने पोलिसांसह सर्वच चकित झाले आहेत.

सूत्रानुसार, मेरठमध्ये चोरट्यांनी १५ फूट बोगदा खोदून चक्क ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. मात्र खूप प्रयत्न करूनही त्यांना दुकानातली तिजोरी उघडता आली नाही. यानंतर चोरट्यांनी दुकानातील भिंतीवर ‘सॉरी’ असा मेसेज लिहून निघून गेले.

एवढेच नाही तर या चोरटयांनी कामाल म्हणजे आपण चोरी करत आहोत हे देवाला दिसू नये म्हणून त्यांनी दुकानातील श्रीकृष्णाची मूर्ती उलटी फिरवली होती. मेरठ पोलीस आता या अनोख्या चोरांचा शोध घेत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment