जळगाव : तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील दोन बालके खेळताना गुरुवारी सकाळी 11 वाजता बेपत्ता झाली. अचानक हरवलेल्या बालकांमुळे त्यांचे पालक हवालदिल झाल्यानंतर पालकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला माहिती कळवली. त्यात एक बालक हा मूकबधीर असल्याने पालकांची चिंता अधिकच वाढली होती. अखेर एमआयडीसी पोलिसांनी त्या बालकांचा शोध घेत कुटूंबियांच्या ताब्यात दिले. यावेळी कुटूंबीयांनी बालकांसह एमआयडीसी पोलिसांचे आभार मानले.
तालुक्यातील रायपूर कुसुंबा गावातील कार्तीक जयसिंग परदेशी (6) व प्रियांशु अजयकुमार वर्मा (4) ही दोन्ही बालके खेळताना गुरुवारी सकाळी 11 वाजता बेपत्ता झाली.
अचानक हरवलेल्या बालकांमुळे त्यांचे पालक हवालदिल झाल्यानंतर पालकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला माहिती कळवली. कार्तीक हा बालक मूकबधीर असल्याने पालकांची चिंता अधिकच वाढली होती.
बालकांचा शोध सुरू असताना कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील रहिवासी रीजवान शेख गणी यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करीत हरवलेल्या बालकांची माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी ताबा घेत. या बालकांना कुटूंबियांच्या ताब्यात दिले. कुटूंबीयांनी बालकांसह एमआयडीसी पोलिसांचे आभार मानले.