जळगाव : पोलीसांत तक्रार का दिली म्हणत २७ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील हनुमान नगरातील रहिवासी अमोल रवींद्र चौधरी वय २७, यांना ४ रोजी ७ वाजता ‘पोलीसांत तक्रार का दिली’ म्हणत तिघांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर एकाने डोक्यासह हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले.
या प्रकरणी अमोल रवींद्र चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.