प्रतिक्षा संपली ! दहावीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार; बोर्डाकडून घोषणा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. दरम्यान, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत २७ तारखेपर्यंत निकाल लागणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर बोर्डाने याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे.

राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/mr आणि ‘http://sscresult.mkcl.org’ या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येणार आहे. यासोबतच इतर काही वेबसाईट आणि डिजिलॉकर या अ‍ॅपवर ही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

दरम्यान, यंदा राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता यापैकी किती विद्यार्थी यशस्वी होणार? याचे उत्तर सोमवारी (२७ मे) मिळेल.