‘प्रत्येक शाळेत असे शिक्षक असावेत’ खुद मंत्र्यांनी शेअर केला ‘हा’ व्हिडिओ

नागालँडचे मंत्री आणि भाजप नेते तेमजेन इमना अलँग यांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ अप्रतिम आहे. अतिशय विनोदी पद्धतीने सर्व काही सांगून ते आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवतात. मंत्री तेमजेन यांची ही शैली इंटरनेट जनतेलाही खूप आवडते. सध्या सोशल साईटवर त्यांची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

४३ वर्षीय तेमजेन हे नागालँडचे उच्च शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्री आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या संवादात्मक शिक्षणाची झलक पाहायला मिळते. अशी शिक्षण व्यवस्था प्रत्येक शाळेत असली पाहिजे, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

याशिवाय प्रत्येक शाळेला अशा शिक्षकांची गरज आहे. व्हिडिओमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या डेस्कवर वेगवेगळ्या भाज्या ठेवल्याचे दिसून येते. यानंतर, शिक्षक एक एक करून त्या मुलांकडे जातात आणि त्यांना नावावरून भाजी ओळखण्यास सांगतात.

पहा व्हिडिओ