प्रदुषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या?

 मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईतील सर्व रस्ते धुतले जाणार आहेत. यासाठी मनपाला सूचना देण्यात आल्या आहेत. वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. दिल्लीपाठोपाठ मुंबई प्रदूषित शहर बनते आहे. वाढते प्रदुषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. या बैठकीत वायू प्रदूषण टाळण्यासाठी आणि धूलिकण कमी करण्यासाठी पाण्याचा मारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या साठी टँकरची व्यवस्था करण्यात यावी तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष पथक देखील तयार करण्याच्या सूचना शिंदेंनी दिल्या.
एकनाथ शिंदे म्हणाले, ” प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे. धूलिकण कमी करण्यासाठी बांधकाम प्रकल्पाच्या तहीयाणी स्मॉग गन स्प्रिंकलर बसवण्यात यावे. एमएमआरडीएच्या बांधकाम साईट धुळमुक्त करा. या सोबतच अर्बन फॉरेस्टवर भर द्यावा. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी. या साठी वॉटर टँकरची संख्या वाढवावी. मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्याने धुण्यात यावे, यामुळे धूलिकण कमी होऊन प्रदूषण कमी होईल. विविध बांधकाम साईट वर प्रदूषण रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन केले जावे. दोन दिवसांआधी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुंबई आणि आजूबाजूच्या पालिका आयुक्तांची बैठक पार पडली होती, ज्यात आयुक्तांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची अंबलबजावणी व्हावी.” असं शिंदे म्हणाले.