भुसावळ । ऐन सणासुदीच्या तोंडावर रेल्वेकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. अशातच प्रवाशांना झटका देणारी बातमी आहे. भुसावळ विभागातील मुर्तिजापूर स्टेशन यार्ड येथे ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी डाउन लांब पल्ल्याच्या लूपच्या तरतुदीसाठी रेल्वे पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला असून यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
भुसावळ आणि नागपूर विभागात, अशा लांब पल्ल्याच्या मालगाड्या (2 मालगाड्यांचे संयोजन) भुसावळ ते नागपूर विभागादरम्यान नियमितपणे धावतात. त्यामुळे मूर्तिजापूर स्थानकावर जवळपास 100 मालगाड्या सामावून घेण्याएवढी लांब लूप लाईन बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. जेणेकरून अशा लांब पल्ल्याच्या मालगाड्या चालवताना, लांब पल्ल्याच्या मालगाड्यांपेक्षा मेल एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देता येईल. लांब पल्ल्याच्या मालगाड्या यशस्वीरीत्या चालवण्याबरोबरच मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेळ वाचवण्यात मदत होईल. त्यासाठी मूर्तिजापूर स्थानकावर लांब पल्ल्याच्या वळणासाठी बांधकाम ब्लॉक करण्याचे नियोजन आहे.
३० आणि ३१ ऑगस्ट रोजी या गाड्या रद्द :
17641 कचेगुडा-नरखेड एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 30.08.2023
17642 नरखेड-काचेगुडा एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 31.08.2023
01127 लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्हारशाह विशेष : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 29.08.2023
01128 बल्हारशाह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 30.08.2023.
11121 भुसावळ- वर्धा एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 30.08.2023.
11122 वर्धा-भुसावळ एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 31.08.2023.
22117 पुणे-अमरावती एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 30.08.2023.
22118 अमरावती-पुणे एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 31.08.2023.
01365 भुसावळ-बडनेरा पॅसेंजर विशेष : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 31.08.2023.
01366 बडनेरा- भुसावळ पॅसेंजर विशेष : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 31.08.2023.
12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 30.08.2023.
12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 30.08.2023.
12136 नागपूर-पुणे एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 30.08.2023.
12135 पुणे- नागपूर एक्सप्रेस : प्रवास प्रारंभ होणारा दिवस (JCO) 31.08.2023.