---Advertisement---

प्रवाशांची गैरसोय : हुतात्मा एक्स्प्रेसला आता मेमूचे डबे; महिनाभर केवळ ईगतपुरीपर्यंतच धावणार

---Advertisement---

भुसावळ : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसने हजारो चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळत असतानाच रेल्वे प्रशासनाने ही गाडी एका महिन्यांसाठी केवळ ईगतपुरीपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय या गाडीला आता मेमूचे रॅक (डबे) जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. भुसावळ-पुणे गाडीला 20 मे ते 19 जून 2023 दरम्यान मेमू रॅक जोडण्यात येणार असून ही गाडी भुसावळून ईगतपुरी व तेथून पुन्हा भुसावळ अशी नेहमीच्या वेळेत धावेल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

पनवेलसह पुणे जाण्यासाठी गैरसोय होणार
भुसावळ येथून रात्री 12.30 वाजता सुटणारी ही गाडी रात्री त्याच वेळी सुटणार आहे. मात्र ही गाडी फक्त ईगतपुरीपर्यतच चालविली जाणार आहे. ईगतपुरीच्या पुढे कल्याण, पनवेल, लोणावळा, पुण्यासाठी ही गाडी चालविली जाणार नाही. ईगतपुरीच ही गाडी दिवसभर थांबून परतीच्या वेळेत तेथून सुटून रात्री भुसावळ येथे परत येणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment