---Advertisement---

प्रवाशांना दिलासा : नांदगाव स्थानकावर तीन गाड्यांना नियमित थांबा

---Advertisement---

 भुसावळ : नांदगाव रेल्वे स्थानकावर कुशीनगर, कामायनी व जनता एक्स्प्रेसला नियमित थांबा देण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्थानकावर गाड्यांना थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेत 8 एप्रिलपासून या गाड्यांना येथे नियमित थांबा जाहीर केला आहे.

या गाड्या थांबणार नांदगावात
गाडी क्रमांक 22538/22537 एलटीटी-गोरखपूर कुशीनगर, 11072/11071 एलटीटी-वाराणसी कामायनी व 13202/13201 एलटीटी-पटना जनता एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वानंतर आता 8 एप्रिलपासून नियमित थांबा देण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment