प्रवाशांनो, आनंद वार्ता! ‘ही’ मेमू आता भुसावळपर्यंत धावणार

नंदुरबार : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उधना-पाळधी मेमू आता भुसावळपर्यंत जाणार आहे. रेल्वे मंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी आज, शनिवारी दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर हिरवीझेंडी दाखवली. यामुळे आता प्रवाशांचा प्रवास  आणखी सुखकर होणार आहे.

उधना-पाळधी मेमू भुसावळपर्यंत सुरू करण्याची मागणी, नागरिक अनेक दिवसांपासून करीत होते. दरम्यान, रेल्वे मंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी याची दखल घेतली असून आता भुसावळपर्यंत धावण्यासाठी मंजुरी दिलीय. येत्या काही दिवसात उधना-पाळधी मेमू आता भुसावळपर्यंत धावणार आहे.

यावेळी खासदार सुभाष भामरे,आ.जयकुमार रावल जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, अनिल वानखेडे, नारायण पाटील, नगराध्यक्षा रजनी वानखेडे, कामराज निकम, जिल्हा परिषद सभापती महावीरसिंह रावल, संजीवनी सिसोदे, पंचायत समिती सभापती वंदना ईशी, उपसभापती रणजित गिरासे, रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते.