प्रवाशांनो लक्ष द्या! पुणे-कानपूर दरम्यान धावणार विशेष गाडी, ‘या’ स्टेशनवर मिळणार थांबा?

भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे ते कानपूर दरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली.

01037 क्रमांकांची पुणे – कानपुर एक्स्प्रेस ही विशेष गाडी 3 मे 2023 ते 15 जून 2023 दरम्यान दर बुधवारी सकाळी 6.35 वाजता पुण्याहून सुटेल.तर दुसऱ्या दिवशी कानपूर सेंट्रलला सकाळी 07.10 वाजेला पोहोचेल. भुसावळ येथे ही गाडी दुपारी 15.55 पोहोचेल

कोणत्या रेल्वे स्टेशनवर मिळणार थांबा?
ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन आणि उरई या स्थानकावर थांबणार आहे.

01038 कानपुर – पुणे 
01038 कानपुर – पुणे ही गाडी 4 मे ते 16 जून दरम्यान दर गुरुवारी सकाळी 8:50 वाजता कानपूर सेंट्रलवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:05 वाजता पुण्याला पोहोचेल.

कानपुर येथून निघाल्यानंतर ही गाडी ओराई येथे सकाळी 10.25वा, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन येथे दुपारी 13.25, बिना येथे सायंकाळी 16.15, राणी कमलापतीला सायंकाळी 18.40, इटारसीला रात्री 20.20 ला, खांडवा येथे 23.30, भुसावळ जंक्शनला रात्री 01.40, मनमाडला पहाटे 05.10, त्यांनतर कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड ला सकाळी 10.27 आणि पुणे येथे 12:05 वाजता पोहोचेल