---Advertisement---

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भुसावळमार्गे अमरावती- सातारा अनारक्षित विशेष ट्रेन सुरु

---Advertisement---

भुसावळ । भुसावळ जळगाव हुन पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अमरावती ते सातारा अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती-सातारा (ट्रेन क्रमांक ०११५५) ही विशेष ट्रेन दि. २३ जानेवारी पासून सुरु झाली असून ही ट्रेन अमरावती येथून सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सातारा येथे पोहोचणार आहे.

सातारा-अमरावती (ट्रेन क्रमांक ०११५६) ही विशेष गाडी दि. २८ जानेवारी रोजी सातारा येथून सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी सुटून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता अमरावती येथे पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान बडनेरा (फक्त ट्रेन क्रमांक ०११५५ साठी), मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, बेलापूर, अहमदनगर, दौंड काॅर्ड लाइन, पुणे, जेजुरी आणि लोणंद येथे थांबा घेणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment