प्रवाशांसाठी खुशखबर ! भुसावळमार्गे पुण्यासाठी धावणार विशेष गाडी, कोण-कोणत्या स्थानकावर थांबणार

भुसावळ । भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सध्या उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विविध मार्गावर विशेष गाड्या चालविल्या जात आहे. यातच ओडीशा राज्यातील संबळपूर ते पुणे दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विशेष ही गाडी भुसावळमार्गे धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. या साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसच्या अप व डाऊन प्रत्येकी १२ अशा एकूण २४ फेऱ्या होणार आहे.

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०८३२७ संबळपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी १४ एप्रिल ते ३० जून २०२४ या कालावधीत प्रत्येक रविवारी संबळपूर येथून २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०८३२८ पुणे-संबळपूर साप्ताहिक विशेष गाडी १६ एप्रिल ते २ जुलै २०२४ या कालावधीत प्रत्येक मंगळवारी दिनांक पुणे येथून ०९.१५ वाजता सुटेल आणि संबळपूर येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा
या गाडीला बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंद, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन इथे थांबे असतील

२-टीयर वातानुकुलीत १, ३-टीयर वातानुकुलीत ४, शयनयान श्रेणी ९, द्वितीय श्रेणी ६ व लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन २ अशी या गाडीची संरचना आहे.