प्रवेशपत्रावर कसा आला सनी लिओनीचा फोटो ?, समोर आले सत्य

उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळाच्या वतीने राज्यात 17 आणि 18 फेब्रुवारी 2024 रोजी कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा राज्यभरातील 2300 हून अधिक केंद्रांवर दोन दिवस चालली होती आणि सुमारे 48 लाख उमेदवारांनी भरती परीक्षेला बसले होते. एका उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचे नाव आणि फोटो समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता सत्य बाहेर आले. या संदर्भात भरती मंडळानेही निवेदन जारी केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचे नाव आणि फोटो होता. तो महोबा जिल्ह्यातील रगौलिया वृद्ध गावाचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने सायबर कॅफेमधून यूपी पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज केल्याचे समोर आले. सनी लिओनीचे नाव आणि फोटो कसा आला हे माहित नसल्याचे पोलिसांना सांगितले.

या संदर्भात, UPPRPB ने X वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अर्जातील चुका दुरुस्त करण्यासाठी 17 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान दुरुस्ती विंडो उघडण्यात आली होती. अशा स्थितीत ज्याच्याकडे उमेदवाराचे लॉगिन आणि पासवर्ड होता. त्याने अर्जातील नाव, वैयक्तिक तपशील आणि फोटोमध्ये छेडछाड केली आणि त्याऐवजी अभिनेत्रीचे नाव आणि फोटो टाकला.