---Advertisement---

प्रापंचिक कारणावरून वाद; पत्नीने थेट पतीच्या अंगावर उकळते पाणी ओतले

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ११ ऑक्टोबर २०२३। बारामती मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रापंचिक कारणावरून पत्नीने पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नीवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सागर आणि कविता या दोघांमध्ये प्रापंचिक कारणावरून यांच्यात वाद झाला. हा वाद इतका टोकावर गेला कि  या वादातून कविताने पती सागर याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिने पतीवर उकळते गरम पाणी त्याच्या तोंडावर, छातीवर, पोटावर,  टाकले. यामध्ये त्यांची कातडी ४० टक्के भाजली. तसेच,आरोपी पत्नीने तेथे पडलेले लोखंडी चौकोनी छोट्या पाईपने फिर्यादीच्या डोक्यात आणि पाठीवर मारहाण केली. तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली पत्नीने पतीला दिली.

सागर मधुकर कुंभार वय ३५ वर्ष यांनी दिलेल्या फ्र्यादी वरून कविता सागर कुंभार  वय २८ वर्ष यांच्या विरोधात भादवि कलम ३०७, ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---