---Advertisement---

प्रियकराने रिसिव्ह केला नाही व्हिडिओ कॉल, संतप्त प्रेयसीने उचललं टोकाचं पाऊल

---Advertisement---

प्रियकराने व्हिडिओ कॉल रिसिव्ह न केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रेयसीने आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. राजिकी वुमेन्स असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनीचे ज्या मुलासोबत प्रेमसंबंध होते ते उघड झाले आहे. तरुणीने त्याच्याशी व्हिडिओ कॉल करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अनेक वेळा मेसेज केले. मात्र, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने या आयटी फर्स्टच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात जाऊन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात ही घटना घडलीय. पोलीस अधिकारी देव रंजन वर्मा यांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. कानपूरमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, मृताचे नातेवाईक बलिया येथे येत आहेत. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारेच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment