हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून समोर आली आहे. विवाहितेने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना आपला त्रास कथन केला. तिने सांगितले की, तिचे सासरचे लोक तिच्याकडे 5 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करत आहेत. हुंडा न मिळाल्यास तिला मारून टाकू, असेही ते सांगत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हे प्रकरण चौरीचौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इब्राहिमपूर गावचे आहे. शनिवारी एका विवाहितेने येथील पोलीस ठाणे गाठले. रडत रडत तिने पोलिसांना सांगितले की, तिच्या सासरच्या लोकांनी तिला हुंड्यासाठी कसे मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने सांगितले की, तिचा विवाह रामपूर कोपा, कुशीनगर येथे मे 2021 मध्ये झाला होता. लग्न झाल्यापासून सासरच्यांचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन चांगला नव्हता. तिचा पती रामफल चौहान तिला मारहाण करायचा.
पीडितेने सांगितले की, “जेव्हा माझ्या पतीने मला पहिल्यांदा मारहाण केली तेव्हा मी माझ्या सासरच्या लोकांना याबद्दल सांगितले. तर ते म्हणाले की ते जे काही करतोय ते बरोबर करतोय. जर तुम्ही कमी हुंडा आणलात तर तुम्हाला मारहाण सहन करावी लागेल.” विवाहितेचे म्हणणे आहे की, लग्नानंतर तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना भरपूर हुंडा दिला. मात्र नंतर त्यांनी आणखी 5 लाख रुपयांची मागणी सुरू केली. दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.