महाड : तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून २३ वर्षीय तरुणाने जीवन संपविले आहे. सतीश पवार असे मृत तरुणाचे नाव आहे.
सूत्रानुसार, तालुक्यातील सोलम कोंड येथे ही घटना घडली आहे. सतीश पवार याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तरुणीने नकार दिल्याने सतीश दारूच्या आहारी गेला आणि नैराश्यातुन घरात नायलॉन रश्शीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आपले जीवन संपवले.
याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जीवन संपवल्याचा स्टेट्स ठेवला असल्याचे त्याच्या मित्र मंडळींकडुन सांगण्यात येत असुन या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.