जळगाव : चारित्र्यावर संशयवरून अनेक कुटुंब उध्वस्थ झाल्याचे आपण वाचलं असलेच अशीच एक घटना समोर आली आहे. एका 21 वर्षीय विवाहितेचा प्रेमविवाह केलेल्या पतीकडून चारीत्र्यावर संशय घेऊन छळ करण्यात आला तसेच दारू पिऊन मारहाण करण्यात आल्याची घटना यावल तालुक्यात घडली आहे. या प्रकणारी यावल पोलिसात पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, यावल तालुक्यातील दहिगावयेथे ही घटना घडली आहे. नेहा योगेश महाजन (21) या विवाहितेने यावल पोलिसात फिर्यादी दिली. तिने योगेश प्रेमचंद महाजन यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाह केल्यानंतर पती योगेश महाजन याने विवाहितेच्या चारीत्र्यावर संशय घेत दारू पिऊन तिला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली तसेच सासू साधना प्रेमचंद महाजन, जेठ सेजल प्रेमचंद महाजन या दोघांनी देखील तिचा छळ केला.
याबाबत यावल पोलिसात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती योगेश महाजन, सासू साधना महाजन व जेठ सेजल महाजन या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र पवार करीत आहे.